अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये खेळवल्या जात असलेल्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी अतिशय सुमार झालीय.

ग्रुप ए मध्ये पाकिस्तान संघ आतापर्यंत 3 सामने खेळला असून यापैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवता आलाय. आता चौथा सामना 16 जुनला आयर्लंडविरुद्ध फ्लोरिडामध्ये रंगणार आहे.

सुपर-8 मध्ये प्रवेश करण्यासाठी पाकिस्तानला हा सामना चांगला नेट रनरेट राखून जिंकावा लागणार आहे. त्याचबरोबर अमेरिका शेवटचा सामना हरावा अशी प्रार्थनाही करावी लागणार आहे.

पण पाकिस्तान वि. आयर्लंड आणि अमेरिका वि. आयर्लंड सामना पावसामुळे रद्द झाला तर मात्र पाकिस्तानला या स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळावा लागणार आहे.

अशाात पाकिस्तानसाठी एक वाईट बातमी आहे. प्लोरिडामध्ये मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती आली आहे. 16 जूनलाही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

त्यामुळे हा सामना दुसऱ्या ठिकाणी खेळवला जाण्याची शक्यता आहे. पण सामना दुसरीकडे शिफ्ट झाला नाही तर मात्र पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर होऊ शकतो.

रिपोर्ट्सनुसार हा सामना शिफ्ट होऊ शकतो. कारण पुर परिस्थितीत क्रिकेट चाहते, स्टार आणि खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची आहे.

पण त्याआधी भारतीय संघाचा 15 जूनला कॅनडाविरुद्ध फ्लोरिडामध्येच सामना आहे. पावसामुळे हा सामनादेखील दुसरीकडे खेळवला जाऊ शकतो.

VIEW ALL

Read Next Story