टीम इंडियाने साखळी फेरीतील दमदार कामगिरीनंतर आता सुपर 8 मध्ये एन्ट्री केली आहे. साखळी फेरीत एक सामना अद्याप बाकी आहे.
साखळी फेरीतील सामने संपल्यानंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजला आगामी सामन्यांसाठी रवाना होईल. अशातच मोठी माहिती समोर आलीये.
कॅनडाविरुद्धच्या सामन्यानंतर दोन राखीव खेळाडूंना मायदेशी जाण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आलीये.
कॅनडाविरुद्धच्या सामन्यानंतर युवा स्टार शुभमन गिल आणि आवेश खान यांना भारतीय संघातून सोडण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंटने घेतलाय.
तर रिंकू सिंग आणि खलील अहमद यांना संघासोबत वेस्ट इंडिजला जावं लागणार आहे. टीम मॅनेजमेंटने हा निर्णय घेतलाय.
साखळी सामन्यानंतर शुभमन आणि आवेशला रिलीज करण्याचा प्लॅन नव्हता. परंतू सध्याचं बाकावरचं वजन पाहता, हा निर्णय घेण्यात आलाय.
दरम्यान, टीम इंडिया आता 17 खेळाडूंसोबत आगामी वर्ल्ड कप विजयाची वाटचाल पूर्ण करणार आहे.