या यादीत पहिलं नाव आहे त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं, सचिनने अनेक व्यवसायात गुंतवणूक केली आहे.
युएईतील टूर अँड ट्रॅव्हल कंपनी मुसाफिरमध्ये सचिनची 7.5 टक्के भागिदारी आहे. याशिवाय स्मॅश इंटरटेनमेंटमध्ये 18 टक्क्यांची गुंतवणूक आहे.
याशिवाय इंडियन सुपर लीगमध्ये केरळ ब्लास्टर्स संघाचा सचिन तेंडुलकर सहमालक आहे.
विराट कोहलीची अनेक व्यवसायात गुंतवणूक आहे. इंडियन सुपर लीगमध्ये एफसी गोवा संघाचा तो सहमालक आहे.
फिटनेस चेन चिसेलमध्ये विराट कोहलीची 90 कोटींची गुंवतणूक आहे.
टीम इंडिया माजी कर्णधार सौरव गांगुलीने फूड पॅव्हेलिअनम्ये मोठी गुंतवणूक केली आहे.
इंडियन सुपर लीगमध्ये एटी के क्लबमध्ये सौरव गांगुलीची भागिदारी आहे.
एमएस धोनीची फॅन फॉलोईंग आजही सर्वाधिक आहे. धोनी आयएसएलमध्ये चेन्नईईन एफसीचा सहमालक आहे.
एमएस धोनीची फॅन फॉलोईंग आजही सर्वाधिक आहे. धोनी आयएसएलमध्ये चेन्नईईन एफसीचा सहमालक आहे.
भारताचा महान फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे बॅटवर लावलेल्या जाणाऱ्या 'चिप स्पेकटॉम'चा फाऊंडर आहे.
भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने 2005 मध्ये रेस्टॉरंटची सुरुवात केली. पुण्यता झहीरचा स्पोर्ट्स लाऊंज आहे.
याशिवाय झहीर खानने प्रो स्पोर्ट्स फिटनेस सेंटरमध्ये गुंतवणूक केलीय. ही कंपनी मुंबईत आहे.