चेन्नईची नवा कर्णधार ऋतुराज गायकवाडची पत्नीही क्रिकेटर आहे. उत्कर्षा पवार असं तिचं नाव असून ती महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातून खेळते.

उत्कर्षा पवार ही राईट हँड मध्यमती गोलंदाज आहे. 15 नोव्हेंबर 2021 ला पंजाबविरुद्ध ती आपला शेवटचा सामना खेळलीय.

ऋतुराज आणि उत्कर्षा गेल्या अनेक काळापासून रिलेशनशीपमध्ये होते. 3 जून 2023 मध्ये त्यांनी महाराष्ट्रीयन परंपरेनुसार लग्न केलं.

सीएसकेचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनीप्रमाणेच उत्कर्षा पवारही सौंदर्यात मागे नाही. तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

उत्कर्षा पवार महिला प्रीमिअर लीगच्या ऑक्शनमध्येही सहभागी झाली होती. तीची बेस प्राईज 10 लाख रुपये होती. पण तिच्यावर कोणी बोली लावली नाही.

अंजिक्य रहाणेची पत्नी राधिका आणि ऋतुराजची पत्नी उत्कर्षा या दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत.

उत्कर्षा सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते. ऋतुराज आणि उत्कर्षाचे अनेक फोटो त्यांच्य अधिकृत अकाऊंटवर असून त्याला चाहत्यांची पसंतीही मिळते.

VIEW ALL

Read Next Story