शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दोन दिवासंपूर्वी एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची तुलना औरंगजेबाशी केली.

या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं असून संजय राऊत अडचणीत येण्याची शक्यता आहे. भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई भाजपा सचिव विवेकानंद गुप्ता यांनी निवडणूक आयोग आणि भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी विवेकानंद केली आहे.

पीएम मोदी यांची तुलना औरंगजेबाशी करुन संजय राऊत यांनी एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही भाजपने केला आहे.

संजय राऊत मुद्दाहून अधिक वक्तव्य करुन समाजात जातीय तेढ निर्माण करतायत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीही भाजपने केली आहे.

औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला, म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीवरुन महाराष्ट्रावर चाल करुन येते, दोघांची विचारसरणी सारखीच आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं.

VIEW ALL

Read Next Story