इंडियन प्रीमिअर लीगच्या सोळाव्या हंगामाआधी एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला आहे.

सीएसकेचा स्टार ऑलराऊंडर बेन स्टोक्सने आयपीएल 2024 मधून माघार घेतली आहे. सीएसकेने अधिकृत निवदेन देत ही माहिती दिली आहे.

इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स वर्कलोड आणि फिटनेस राखण्यासाठी आयपीएलमधून बाहेर पडत आहे, असं या निवेदनात नमुद करण्यात आलं आहे.

आयपीएलआधी बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघ कसोटी क्रिकेट खेळणार आहे. तसंच टी20 वर्ल्डकपमध्येही बेन स्टोक्सची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

आयपीएलआधी भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी बेन स्टोक्सला तयारी करायची आहे.

32 वर्षांच्या बेन स्टोक्सवर आयपीएल लिलावात चेन्नई सुपर किंग्सने 16.25 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेतलं होतं.

आयपीएल 2023 मध्ये स्टोक्स केवळ दोन सामने खेळला आणि यात त्याने केवळ 15 धावा केल्या होत्या.

नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात बेन स्टोक्सने 304 धावा केल्या होत्या.

VIEW ALL

Read Next Story