डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल गेल्या काही काळापासून टीम इंडियातून बाहेर आहे.

आधी एशिया कप, नंतर वर्ल्डकप आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेतही चहलला टीम इंडियात संधी देण्यात आली नाही

सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या भारतीय निवड समितीला चहलने कडक उत्तर दिलंय. विजय हजारे ट्रॉफीत चहलने दमदार कामगिरी केलीय.

हरियाणा संघाकडून खेळणाऱ्या युजवेंद्र चहलनने उत्तराखंड संघाविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 26 धावात तब्बल सहा विकेट घेतल्या.

या कामगिरीबरोबरच चहलने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 200 विकेटचा टप्पा पार केला. 130 प्रथम श्रेणी सामन्यात त्याने ही कामगिरी केली आहे.

युजवेंद्र चहलन टीम इंडियासाठी शेवटचा सामना ऑगस्ट 2023 मध्ये वेस्टइंडिजविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून तो संघाबाहेर आहे.

चहलने भारतासाठी 72 एकदिवसीय सामन्यात 121 विकेट, तर 80 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 96 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 187 विकेट जमा आहेत.

VIEW ALL

Read Next Story