'रामायणा'तील सीतेचं नवऱ्याच्या मांडीवर बसून फोटोशूट; चाहते संतापून म्हणाले, 'अशा पोजेस...'

त्या भूमिकेमुळे झाल्या लोकप्रिय

अभिनेत्री दीपिका चिखलिया या त्यांनी रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेत साकारलेल्या 'माता सीतेच्या' भूमिकेमुळे लोकप्रिय झाल्या.

घराघरात पोहचवलं

80 च्या दशकामध्ये दीपिका चिखलिया यांना सीतेच्या भूमिकेने भारतामधील घराघरात पोहचवलं.

आजही दिसतो प्रभाव

दीपिका यांनी साकारलेल्या या कार्यक्रमातील भूमिकाचा प्रभाव आजही दिसून येतो. आजही सीता म्हटल्यावर दीपिका यांनी साकारलेलीच भूमिका डोळ्यासमोर येते.

लोकप्रियतेचा असाही फटका

दीपिका यांना मिळालेल्या या लोकप्रियतेचा आजही अनेकदा त्यांना मनस्ताप होताना दिसतोय. नुकतेच त्यांनी पतीबरोबर शेअर केलेल्या फोटोवरुन त्यांच्यावर टीका होत आहे.

पतीबरोबरचे फोटो केलेले पोस्ट

दीपिका यांनी पती हेमंत टोपीवाला यांच्याबरोबरचे काही फोटो 23 नोव्हेंबर रोजी शेअर केले.

...म्हणून केलेली पोस्ट

23 नोव्हेंबर रोजी दीपिका आणि हेमंत यांच्या लग्नाचा त्या दिवशी वाढदिवस होता. त्यानिमित्त त्यांनी सुंदर कॅप्शनसहीत हे फोटोंचं व्हिडीओ फॉरमॅटमधील कोलाज शेअर केलेलं.

मांडीवर बसून हसतानाचे फोटो

या फोटोंमध्ये दीपिका या हेमंत यांच्या मांडीवर बसल्याचं पाहायला मिळत आहे. पतीच्या मांडीवर बसून दीपिका हसत असल्याचं दिसतंय.

अशा पोज देऊ नका

मात्र अनेकांनी सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे हे फोटो पसंत पडलेले नाही. त्यांनी दीपिका यांना अशा पोज देऊ नका तुमच्याबद्दल संपूर्ण देशाला आदर वाटतो असं म्हटलंय.

अनेकांनी नोंदवला आक्षेप

अनेकांनी दीपिका यांच्या या पोस्ट खाली कमेंट करुन आपली मतं मांडली आहेत. बऱ्याच प्रतिक्रिया या नकारात्मक आहेत. अनेकांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

मान, मर्यादेचा विचार करा असा सल्ला

बऱ्याच जणांनी हे तुम्हाला शोभत नाही. मान, मर्यादेचा विचार करुनच पोस्ट करत जा असा सल्लाही दीपिका यांना दिला आहे.

VIEW ALL

Read Next Story