IPL मधून मुंबई संघ बाद

आयपीएल स्पर्धेतून मुंबई इंडियन्स संघ बाद झाला आहे. गुजरात टायटन्सने क्लालिफायर सामन्यात पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

मुंबईने 62 धावांनी गमावला सामना

शुक्रवारी झालेल्या या सामन्यात गुजरातने मुंबईसमोर 234 धावांचा डोंगर उभा केला होता. पण मुंबई संघाने 62 धावांनी हा सामना गमावला.

शुभमनची 129 धावांची तुफानी खेळी

मुंबईने टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 233 धावा केल्या. शुभमनने यावेळी 129 धावांची तुफानी खेळी केली.

171 धावांवर मुंबईवर गारद

मुंबईचा सगळा संघ 18.2 ओव्हरमध्येच 171 धावांवर गारद झाला. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा वगळता एकही खेळाडू चांगली खेळी करु शकला नाहीत.

चीअरलीडर्सही नाराज

सामन्यात मुंबई इंडियन्सच्या विकेट पडत असताना फक्त प्रेक्षकच नाही, तर चीअरलीडर्सही नाराज झाल्या होत्या.

सोशल मीडियावर व्हायरल

सूर्यकुमार बाद झाल्यानंतर चिअरलीडर्सचे चेहरे पडले होते. त्यांची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

चीअरलीडर्सला अश्रू अनावर

सूर्याने 38 चेंडूत 61 धावा केल्या. पण क्रिस जॉर्डन बाद झाल्यानंतर तर चीअरलीडर्सला अश्रू अनावर झाले.

VIEW ALL

Read Next Story