तुम्हालाही ही वाक्ये ऐकायला आली आहेत का?

माझ्या आयुष्यातील तू पहिली मुलगी आहेस...

मला आयुष्यात एकदाच प्रेम झालंय असं खोटं पुरुष प्रत्येकवेळी बोलत असतो. समोरची व्यक्ती सोडून जाऊ नये म्हणून अशा प्रकारचे खोटं बोललं जात असावं.

लग्नाआधी सेक्स नको

कोणत्याही मुलीचे मन जिंकण्यासाठी पुरुष अनेकदा खोटं बोलतो की लग्नाआधी मी अजिबात इंटिमेट होणार नाहीत. पण मुलगी हो म्हणताच खेळ पूर्णपणे बदलतो.

पैशांबद्दल खोटं...

अनेकादा काही पुरुष आपल्याकडे खूप पैसा आहे असं दाखवून किंवा सांगून त्याच्या प्रेयसीला किंवा पत्नीला फसवण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच विवाहित पुरुष अनेकदा पैसे असूनही पैसे नाहीत असेच सांगतात.

मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही...

अनेकदा तुम्ही तुमच्या मित्रांनाही त्याच्या गर्लफ्रेन्डला फोनवर सांगताना पाहिलं असेल की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि फोन कट केल्यावर लगेचच त्याच्या चेहऱ्यावर एक हसू येतं. तुम्हीही समजून जाता की हा किती खरं बोलतोय

मी फक्त तुझाच विचार करतो...

अनेक वेळा पुरुष जोडीदाराचं मन जिंकण्यासाठी आणि तिला दुःखी न करण्यासाठी मी फक्त तुझ्याबद्दल विचार करतो असे खोटं बोलतात.

मी सिगरेट सोडली आहे...

नात्यात अनेकदा स्त्रिया पुरुषांना धूम्रपान करु नको असे सांगतात. तेव्हा काही पुरुष खोटे बोलतात की मी सिगारेट ओढत नाही.

मी तिच्याकडे पाहत नव्हतो...

अनेकदा रस्त्याने जाताना किंवा एखाद्या ठिकाणी पुरुष त्यांच्यासोबत असलेल्या महिलेसमोर हे वाक्य म्हणतोच. अचानक दुसरी महिला समोरून जाते तेव्हा पुरुष तिच्याकडे पाहू लागतात तेव्हा खोटे बोलून प्रकरण टाळतात

मी रिलेशनशिपमध्ये नाही...

अनेकदा जेव्हा पुरुष रिलेशनशिपमध्ये असताना दुसर्‍या स्त्रीकडे आकर्षित होतात तेव्हा ते तिच्याशी खोटे बोलतात की ते सिंगल आहेत. (सर्व फोटो - Freepik)

VIEW ALL

Read Next Story