इंग्लंडविरुद्ध धर्मशाला येथे खेळताना कुलदीप यादवने 5 विकेट्स घेत स्टोक्स अँड कंपनीला गुडघ्यावर टेकवलं.
कुलदीपच्या या यशस्वी माऱ्यामुळे इंग्लंडचा डाव 218 धावांवर गडगडला. अशातच आता कुलदीपने 92 वर्षानंतर एक रेकॉर्ड रचलाय.
कुलदीप यादवे पहिल्या 50 विकेट्समध्ये प्रत्येक विकेट्ससाठी घेतलेल्या बॉलची सरासरी ही सर्वात कमी ठरली आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये 50 विकेट्स घेण्यासाठी कुलदीपला 1871 बॉल टाकावे लागले.
भारताच्या कसोटी इतिहासात 2000 चेंडूंपेक्षा कमी बॉलमध्ये 50 कसोटी विकेट्स घेणारा कुलदीप पहिला खेळाडू ठरला आहे.
कुलदीपच्या आधी अक्षर पटेलला 50 विकेट्स पूर्ण करण्यासाठी 2205 बॉल टाकावे लागले. तर बुमराहच्या बाबतीत हा आकडा 2520 वर जातो.
दरम्यान, कुलदीप यादवच्या 72 धावा देत 5 महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केलं. त्यामुळे आता टीम इंडियाने आघाडी मिळवली आहे.