भारत आणि इंग्लंडदरम्यानचा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना धर्मशाला इथं खेळवला जात आहे.

हा कसोटी सामना भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज आर अश्विनसाठी खास आहे. कसोटी कारकिर्दीतील त्याचा हा 100 वा कसोटी सामना आहे.

सामन्याच्या सुरुवातीला रविचंद्रन अश्विनचा सन्मान करण्यात आला. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या हस्ते अश्विनला स्पेशल कॅप भेट देण्यात आली.

शंभराव्या कसोटी सामन्यासाठी अश्विनची पत्नी प्रीति नारायण आणि दोन मुली उपस्थित होत्या. त्यांच्याबरोबर अश्विनने हा खास क्षण साजरा केला.

धर्मशाला कसोटी सामन्यात ज्यावेळी आर अश्विन मैदानावर उतरला त्यावेळी भारतीय खेळाडूंनी त्याला गार्ड ऑफ ऑनर दिला.

भारतासाठी 100 कसोटी खेळणारा अश्विन हा 14 वा खेळाडू आहे. याआधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हिव्हिएस लक्ष्मण, अनिल कुंबळे, कपिल देव, सुनिल गावसकर यांनी ही कामगिरी केलीय.

आर अश्विनने 100 कसोटी सामन्यात 511 विकेट घेतल्या आहेत. 59 धावांवर 7 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. अश्विनने 8 वेळा 10 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे.

VIEW ALL

Read Next Story