'या' 8 पदार्थामुळं मुलांचा बौद्धिक विकास होतो!

लहान मुलांच्या विकासासाठी शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यदेखील महत्त्वाचे आहे. मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हे 8 पदार्थ खूप फायदेशीर ठरतात.

मासे

सेल्मन, टूना यासारख्या माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड आढळले जाते. हे मुलांच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक असतात. यामुळं मेंदूच्या पेशी निर्माण होण्यास मदत होते.

डाळी आणि कडधान्ये

डाळी आणि कडधान्यांमध्ये प्रोटीन, फायबर, आयर्न आणि कॉम्पलेक्स कार्बोहायड्रेट आढळले जातात. हे मेंदूसाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वे पुरवतात आणि एनर्जी देतात.

बेरीज

स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी, रस्पबेरीसारख्या फळांमध्ये अँटीऑक्सीडेंट आढळले जातात. ते बुद्धीच्या विकासासाठी फायदेशीर असतात. हे फळ स्मरणशक्ती वाढवतात.

अंडी

अंड्यात प्रोटीन, कोलीनयासारखे अन्य पोषक तत्वे असतात. मेमरी, ध्यान आणि अन्य कौशल्य शिकण्यास मदत करतात.

नट्स आणि बीज

बदाम, अक्रोड, चिया यासारख्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, ओमेगा-3, फॅटी अॅसिड अन्य पोषक तत्वे असतात. जे बौद्धिक विकासासाठी फायदेशीर असतात.

दही

दह्यात प्रोबायोटिक्स आढळले जातात. जे बौद्धिक विकासासाठी व मेंटल हेल्थसाठी खूप मदतशीर असतात.

हिरव्या पालेभाज्या

पालक, ब्रोकोलीसारख्या हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन- के, फोलेट आणि अन्य पोषक तत्वे आढळतात. जे बौद्धिक विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story