Rahul Dravid Salary: टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांच्या पगाराचा आकडा माहितीये का?

Dec 06,2023


नुकतंच राहुल द्रविड यांना भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी BCCI कडून मुदतवाढ देण्यात आली.


आता भारतीय संघाचे पुढील लक्ष्य 2024 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकावर नाव कोरणे हे असेल.


या दरम्यान सध्या राहुल द्रविड आता आणखी किती काळ या पदावर राहणार? त्यांचं मानधन किती असेल अशी चर्चा रंगली आहे.


द्रविड यांचा कार्यकाळ किती असेल याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता आहे


मिळालेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी जून-जुलैमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपपर्यंत ते या पदावर राहणार असल्याची शक्यता आहे.


मानधनाच्या आराखड्याप्रमाणे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी असलेल्या द्रविड यांना वर्षाला 12 कोटींचं मानधन मिळते.

VIEW ALL

Read Next Story