स्पेनसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या हमजा सलीम डारने इतिहास रचला आहे.

हमजाने युरोपिअन क्रिकेट सीरिज टी-10 लीगमध्ये फक्त 24 चेंडूत शतक ठोकलं.

हमजाने 43 चेंडूत 193 धावा ठोकल्या, ज्यामध्ये 22 षटकार आणि 14 चौकोर होते. टी-10 क्रिकेटमधील हा रेकॉर्ड ठरला आहे.

हमजा सलीम डारने नवव्या ओव्हरमध्ये मोहम्मद वारिसला सलग 6 षटकार लगावले,

हमजा सलीमच्या शतकाच्या जोरावर कैटेलोनिया जगुआरने 10 ओव्हर्समध्ये एकही विकेट न गमावता 257 धावा ठोकल्या.

धावांचा पाठलाग करताना सोहल हॉस्पिटलेट संघ 8 विकेट गमावत फक्त 104 धावा करु शकला. 153 धावांनी त्यांचा पराभव झाला.

हमजाने गोलंदाजीही केली आणि 3 विकेट मिळवले.

28 वर्षीय हमजाने स्पेनसाठी 17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 23.58 च्या सरासरीने 283 धावा केल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story