लग्नाच्या चार वर्षांनंतर क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी घटस्फोट घेतला होता.
शिखर धवन- आएशा मुखर्जी यांनी 10 वर्षांच्या वैवाहिक नात्याला पूर्णविराम दिला होता.
दिनेश कार्तिक- निकीता वंजारा यांनी पाच वर्षांच्या वैवाहिक नात्यानंतर वेगळ्या वाटा निवडल्या होत्या.
मोहम्मद अझरुद्दीननं नौरीनशी निकाह केल्यानंतर त्यानं या नात्यात आलेल्या दुराव्यानंतर अभिनेत्री संगीता बिजलानीशीही लग्न केलं होतं. पण, त्यांचं नातंही फार काळ टीकलं नाही.
विनोद कांबळीनं नोएला लिवाईस या बालमैत्रिणीशी लग्न केलं होतं. पण, 2005 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर त्यानं Andrea Hewitt शी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
रवि शास्त्री रितू सिंग यांनी लग्नाच्या 22 वर्षांनंतर घटस्फोटाचा निर्णय घेतला.
मोहम्मद शामी आणि हसीन जहां यांच्या नात्याला अतिशय गंभीर वळण मिळालं आणि अखेर आरोप प्रत्यारोपांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
वैवाहिक नात्यात क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांच्या वाट्याला अपयश आलं. संध्या यांच्याशी त्यांनी लग्न केलं होतं. पण, छळ आणि हुंड्याचे गंभीर आरोप या खेळाडूवर लावण्यात आले होते. या अपयशी नात्यानंतर त्यांनी अभिनेत्री फरहीनशी लग्न केलं होतं.