निरोगी राहण्यासाठी कित्येकजण त्यांच्या डायट प्लानमध्ये आवळ्याचा समावेश करतात.
आवळ्यामध्ये व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात आढळते, यामुळे आपली रोगप्रतिकरक शक्ती वाढते.
आवळ्यांना फायबरचे चांगले स्त्रोत मानले जाते. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनासंबंधी समस्या दूर होतात.
आवळा हे एक बहुगुणी फळ आहे. यामध्ये असलेले व्हिटामिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठराते.
आवळा या औषधी फळाला आयुर्वेदात देखील खूप महत्त्व आहे.
तुम्हाला माहित आहे का? काही पदार्थांसोबत आवळा खाल्याने मोठे दुष्परिणाम होऊ शकतात.
आवळा कधीही दुधासोबत खाऊ नये. दुध आणि आवळा खाल्याने आपल्या चयापचन क्रियेत आडथाळा निर्माण होतो.
दुध आणि आवळा खाण्यादरम्यान किमान 4 तासांचे अंतर असणे गरजेचे आहे.
आवळ्यासोबत मसालेदार पदार्थ कधीच खाऊ नये. आवळा हा आम्ल पदार्थ आहे. आम्ल पदार्थांसोबत मसालेदार पदार्थ खाणे म्हणजे अनेक आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)