दुहेरी मालिका खेळून 11 वर्ष

भारत आणि पाकिस्तानदरम्यान शेवटची क्रिकेट मालिका 2012 मध्ये खेळवण्यात आली होती. त्यावेळी पाकिस्तानचा संघ भारतात 2 टी20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळला होता.

सात वर्षांनी भारतात येणार

भारतात याआधी 2016 मध्ये झालेल्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ भारतात आला होता.

पाकिस्तान संघ भारतात येणार

या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ तब्बल सात वर्षांनी भारतात खेळायला येणार आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटूंना लवकरच व्हीजा मिळेल असं आश्वासन बीसीसीआयने (BCCI) दुबईत झालेल्या बैठकीत दिलं आहे.

दहा संघांचा समावेश

एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानसह (Ind vs Pak) एकूण 10 संघ सहभागी होतील. 46 दिवसांमध्ये 48 सामने खेळवले जातील.

अहमदाबादमध्ये अंतिम फेरी

सू्त्रांनी दिलेल्या माहिती नुसार 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान भारतात एकदिवसीय वर्ल्ड कप खेळवण्यात येईल. स्पर्धेची अंतिम फेरी अहमदाबाच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये (Narendra Modi Stadium) खेळवली जाईल.

भारतात एकदिवसीय वर्ल्ड कप

जगभरातील क्रिकेट प्रेमींना उत्सुकता आहे ती यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची (ODI World Cup). भारतात या स्पर्धेचं आयोजन होणार असून तारखांचाही खुलासा झाला आहे.

VIEW ALL

Read Next Story