आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आशिया कपसाठी (Asia Cup 2023) भारतीय संघाची घोषणा केली आहे.

Aug 21,2023

के एल राहुल, बुमराह, श्रेयसचं पुनरागमन

रोहित शर्माच्या नेतृत्वातील 17 सदस्यीय संघात के एल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांचं पुनरागमन झालं आहे.

आर अश्विन, चहल बाहेर

पण आशिया कप संघात भारताचा स्टार फिरकी गोलंदाज आर अश्विन आणि युजवेंद्र चहल यांना संधी देण्यात आलेली नाही.

गावसकर संतापले

त्यामुळे अनेक क्रिकेट चाहत्यांनी नाराजी जाहीर करत टीका केली आहे. यादरम्यान, सुनील गावसकर यांचं एक मोठं विधान समोर आलं आहे.

"जो संघ निवडला आहे त्याची साथ द्या"

"हो त्यांना घेतलं जाऊ शकत होतं. आपण कमनशिबी आहोत असा विचार ते करतील. अश्विन वैगेरे यांच्या चर्चा करु नका, जो संघ निवडला आहे त्याची साथ द्या," असं गावसकर म्हणाले आहेत.

"जो संघ निवडला आहे तो अंतिम"

"याला का नाही घेतलं? त्याला का नाही घेतलं? हा चुकीचा विचार आहे. आपण नेहमी हा वाद घालत असतो. पण जो संघ निवडला आहे तो अंतिम आहे," असं त्यांनी सांगितलं.

"आवडत नसेल तर सामना पाहू नका"

पुढे ते म्हणाले की "जर तुम्हाला आवडत नसेल तर सामना पाहू नका. पण यांना का घेतलं नाही अशा चर्चा माझ्याशी करु नका. हा सर्वांचा संघ आहे".

VIEW ALL

Read Next Story