OTTवर धुमाकूळ घालणार गदर -2; कुठे पाहता येणार?

बॉलिवूड अभिनेता सनी देवोलचा गदर-2 बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय.

तारा सिंह आणि सकीनाच्या जोडीला पुन्हा एकदा प्रेक्षकांनी दाद दिली आहे. 10 दिवसांतच गदर 2 ने 360 कोटींचा गल्ला जमवला आहे.

बॉक्स ऑफिसवर सनी देओलची जादू अद्यापही कायम आहे. आता चाहत्यांना गदर 2 ओटीटीवर कधी रिलीज होणार याची प्रतीक्षा आहे.

चित्रपटाचे निर्माते शारिक पटेल यांनी यासंबंधी एक सूचक विधान केले आहे. निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2 महिन्यांनंतर गदर 2 ओटीटीवर रिलीज होऊ शकते.

मात्र, अद्याप ओटीटीची रिलीज डेट जाहीर करण्यात आली नाहीये. मात्र, दिवाळीच्या आसपपास चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात येईल.

मिळालेल्या माहितीनुसार सनीचा गदर-2 Zee 5वर प्रदर्शित होणार आहे.

VIEW ALL

Read Next Story