टीम इंडियाने आयर्लंडविरुद्धचा दुसरा टी20 सामना 33 धावांनी जिंकला आणि या विजयाबरोबरच तीन सामन्यांची मालिकाही 2-0 अशी जिंकली

आयर्लंड विरुद्धचा पहिला सामना टीम इंडियाने 2 धावांनी जिंकला होता. पावसामुळे सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार लावण्यात आला होता.

दुसऱ्या टी20 सामन्यात भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली ती आक्रमक फलंदाज रिंकू सिंहने. रिंकूने अवघ्या 21 चेंडूत 38 धावा केल्या.

पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रिंकूने आयर्लंडच्या गोलंदाजांची पिसं काढली. आपल्या खेळीत रिंकूने तीन षटकार आणि दोन चौकार लगावले.

रिंकूच्या या खेळीमुळे त्याला मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं. यामुळे रिंकूच्या नावावर एक खास रेकॉर्ड जमा झाला आहे.

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पणातच प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला रिंकू सिंग हा अशी कामगिरी करणारा चौथा भारतीय क्रिकेटपटू आहे.

रिंकू सिंगच्या आधी एक बद्रीनात, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांच्या नावावर हा विक्रम जमा आहे.

आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यातून रिंकू सिंहने आंतरराष्टीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पण पहिल्या सामन्यात रिंकू सिंगला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती.

VIEW ALL

Read Next Story