पुन्हा चोकर्स? MR 360 म्हणतो...
क्रिकेटचा महाकुंभ म्हटल्या जाणाऱ्या वर्ल्ड कपला येत्या काही दिवसात सुरूवात होणार आहे.
वर्ल्ड कपच्या तोंडावर अनेक दिग्गज खेळाडू मोठमोठी वक्तव्य करताना दिसत आहेत. अशातच आता दक्षिण अफ्रिकेचा स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्स याने मोठं वक्तव्य केलंय.
सेमीफायनलमध्ये कोणते 4 संघ प्रवेश करतील याबाबत एबी डिव्हिलियर्स याने भविष्यवाणी केली आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडे खूप मजबूत संघ आहेत. या दोन्ही संघांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत प्रवेश करू शकतात, असा विश्वास डिव्हिलियर्सला व्यक्त केलाय.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यासह भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघही उपांत्य फेरीत पोहोचू शकतात, असं मत देखील डिव्हिलियर्सने व्यक्त केलं आहे.
1992 च्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण अफ्रिकेला लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागला होता. दक्षिण अफ्रिकेला एकदाही वर्ल्ड कप जिंकता आला नाही, त्यामुळे दक्षिण अफ्रिकेला चोकर्सचा टॅग लागला होता.
दरम्यान, साऊथ अफ्रिकेने वर्ल्ड कप जिंकला असं एबी डिव्हिलियर्सचं स्वप्न आहे. त्यामुळे यंदा हे स्वप्न पूर्ण होणार आहे का? असा सवाल आता विचारला जात आहे.