आपण सर्वजण आपल्या मुलांचे फोटो आपल्या घराच्या भिंतीवर मोठ्या प्रेमाने लावतो. त्यांच्या बालपणीचे अविस्मरणीय क्षण चित्रांमध्ये पाहून मन आनंदाने भरून येते.
वास्तुशास्त्रात मुलांचे फोटो लावण्याबाबत काही विशेष नियम दिले आहेत. हे नियम पाळल्यास घरातील वातावरण खूप प्रसन्न राहते आणि प्रेम वाढते.
तुमच्या घराची पश्चिम दिशा मुलांशी आणि सर्जनशीलतेशी संबंधित आहे. या दिशेला मुलांचे चित्र लावणे खूप शुभ मानले जाते. यामुळे मुले अभ्यासात हुशार होतात आणि आयुष्यात नेहमी पुढे जातात.
जर तुम्हाला एकच मुलगा असेल तर तुम्ही त्याचा फोटो दक्षिणेच्या भिंतीवर लावू शकता. असे केल्याने, तुमचा मुलगा लवकरच जबाबदार बनतो आणि संपूर्ण कुटुंबाची एकहाती काळजी घेण्याचे धैर्य त्याला प्राप्त होते.
ही दिशा घराच्या मालकाशी संबंधित आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या एकुलत्या एक मुलाचे चित्रही येथे लावू शकता.
तुमच्या मुलाचा फोटो पूर्व दिशेला लावल्याने तुमचे मूल तेजस्वी आणि उत्साही बनते. जीवनात यशस्वी स्थान निर्माण करतो आणि देवाची कृपा त्याच्यावर सदैव असते.
कौटुंबिक फोटो घराच्या उत्तर-पूर्व दिशेला लावावे. असे केल्यास कौटुंबिक संबंध दृढ होतात आणि सर्व लोकांमध्ये एकता आणि सौहार्दपूर्ण संबंध टिकून राहतात.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)