अमीषा पटेल ही सध्या 'गदर 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अनेक वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये अमीषानं कमबॅक केलं आहे.
'कहो ना प्यार है' आणि 'गदर 2' या चित्रपटातून तिला खरी लोकप्रियता मिळाली होती.
2004 मध्ये, अमिषा पटेल आणि तिचे वडील आर्थिक आणि कायदेशीर संघर्षांत अडकले, ज्यामुळे त्यांचे कौटुंबिक मतभेद सार्वजनिक भांडणात झाले होते .
अमिषा पटेलने तिच्या वडिलांवर तिच्या आर्थिक गैरव्यवहाराचा,आणि तिच्या मालमत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप करून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली. तिने तिच्या वडिलांवर खटला दाखल केला आणि 12 कोटी रुपये परत मिळावेत असं देखील म्हटलं.
अमिषा पटेलने उघडपणे असे सांगितले की तिचे पैसे केवळ तिच्या मालकीचे आहेत आणि तिच्या पालकांना देखील त्यावर दावा करण्याचा अधिकार नाही. तिने तिच्या पालकांच्या कृतीबद्दल शंका व्यक्त केली.
णाव वाढत असताना, अमिषा पटेलने आर्थिक गैरव्यवस्थापन आणि विश्वासाचा भंग केल्याचा आरोप करत तिच्या वडिलांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली. वैयक्तिक जीवनावर आणि तिच्या करिअरवर महत्त्वपूर्ण परिणाम झाला. ज्यामुळे तिला चित्रपटसृष्टीत पुन्हा स्थान मिळवणे कठीण झाले.
अमीषा पटेल ही तिच्या आणि विक्रम भट्टच्या असलेल्या अफेअरमुळे देखील चर्चेत आली होती. (All Photo Credit : Ameesha patel Instagram)