होम हवन करताना 'स्वाहा' का म्हणतात?

स्वाहा शब्दाचा अर्थ काय

होम हवन करताना कायम स्वाहा हा शब्द तुमच्या कानावर पडला असेल. पण तुम्ही कधी विचार केला का या स्वाहा शब्दाचा अर्थ काय आहे. होम हवन करताना स्वाहा का म्हटलं जातं.

हवन सामुग्री

होम हवन करताना हवन सामुग्री हवन कुंडात टाकताना स्वाहा म्हटलं जातं. या अर्थ रीतीने वितरण योग्य प्रकारे करणे.

देवांचा नैवेद्य

देवांचा नैवेद्य स्वीकारल्याशिवाय यज्ञ हे अपूर्ण मानलं जातं. त्यामुळे अग्नीत स्वाहा म्हणून सामग्री अर्पण केल्यास ती देवाला मिळते.

स्वाहा या शब्दाबद्दल धर्मात अनेक आख्यायिका आहेत. पहिल्या कथेनुसार राजा दक्षीची कन्या स्वाहा हिचा विवाह हा अग्निदेवाशी झाला होता. त्यामुळे अग्नीदेवाची पूजा करताना पत्नीच स्वाहा म्हणून स्मरण करण्यात येतं. शिवाय स्वाहा म्हटल्यावरच अग्निदेवता नैवेद्य स्विकारतात अशी मान्यता आहे.

दुसरी कथा

दुसरी कथा अशी आहे की, एकदा देवलोकातही दुष्काळ पडला होता. यावर परिस्थितीवर मात करण्यासाठी ब्रह्मदेवाने एक उपाय सुचवला.

पृथ्वीवरील ब्राह्मणांनी देवांताना अन्नपदार्थ द्यावं असं सुचवलं. देवांपर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी अग्निदेवाची निवड करण्यात आली. त्यावेळी अग्निदेवाला दहन करण्याची क्षमता नसल्याने स्वाहाचा जन्म झाला अशी आख्यायिका आहे.

जेव्हा जेव्हा अग्निदेवाला काहीही अर्पण केलं जातं तेव्हा स्वाहा ते जाळून ते देवांपर्यंत पोहोचत, अशी मान्यता आहे.

तिसऱ्या कथेनुसार श्रीकृष्णाने अशा आशिर्वाद दिला होती की, स्वाहाला समर्पित केल्याशिवाय देवतांसाठी अभिप्रेत असलेली सामग्री देवतांना मिळत नाही. त्यामुळे हवनाच्या वेळी स्वाहा म्हटलं जातं. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story