चिंता वाढवणारी बातमी

येत्या काही दिवसांमध्ये हवामानात पुन्हा मोठा बदल घडणार असून, प्रचंड उकाडा जाणवणार असल्याचा इशारा हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे.

Feb 05,2024

इशारा

संयुक्त राष्ट्र (UN) संघटनेच्या वतीनंही हा इशारा देण्यात आला आहे. ज्यानुसार अल निनोच्या परिणामांमुळं 2023 पेक्षाही अधिक उकाडा 2024 या वर्षात दाणवणार आहे.

तापमान जास्तच

भारतीय हवमानशास्त्र विभागानंही यंदाच्या वर्षी थंडीचा कडाका कमी राहणार असून, फेब्रुवारी महिन्यातही तापमान सामान्य अपेक्षेहून जास्त असेल असाच अंदाज वर्तवला होता.

हिवाळ्याची माघार

थोडक्यात फेबरुवारीतच थंडी माघार घेणार असून, मार्च महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा बसण्यास सुरुवात होणार आहे. इतकंच नव्हे, तर देशातील काही भागांमध्ये तापमान मार्च महिन्यातच 40 अंशांवर पोहोचणार आहे.

अल निनो

पॅसिफिक महासागरातून जाणाऱ्या भूमध्य रेषेच्या नजीक सक्रिय असणाऱ्या अल निनो प्रणालीमुळं हे परिणाम दिसत असल्याची माहिती अभ्यासक आणि जाणकारांनी दिली आहे.

जगभरात परिणाम

अल निनोमुळं फक्त भारतच नव्हे तर, संपूर्ण जगातच विपरित परिणाम दिसू लागले आहेत. ज्यामुळं पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर, अरबी समुद्राच्या पृष्ठाचंही तापमान विढलं आहे.

आवाहन...!

हवमानात अतिशय झपाट्यानं होणारे हे सर्व बदल पाहता संयुक्त राष्ट्र संघटनांच्या वतीनं कार्बन उत्सर्जनामध्ये मोठी घट आणावी असं आवाहन सर्व राष्ट्रांना केलं आहे.

VIEW ALL

Read Next Story