राखी, द्रौपदी, श्रीकृष्ण...महाभारतातून सुरु झाला राखीपौर्णिमेचा सण?

रक्षाबंधन हा सण फार प्राचीन काळपासून साजरा केला जात आहे. यामागे अनेक कथा सागिंतल्या जातात पण सर्वात लोकप्रिय कथा म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी.

भगवान श्रीकृष्ण द्रौपदीचा भाऊ कसा झाला , त्यांनी द्रौपदीला कोणते वचन दिले आणि बहिण भावाच्या मनगटावरच राखी का बांधते हे जाणून घेऊया.

महाभारतानुसार, ज्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी शिशुपालला सुदर्शन चक्राने मारले तेव्हा सुदर्शन चक्र बोटावर बसण्याआधीच श्रीकृष्णांचे मनगट कापले.

तेव्हा द्रौपदीने तिच्या साडीचा काट फाडून भगवान श्रीकृष्णाच्या मनगटावर बांधले. तेव्हा श्रीकृष्णांने द्रौपदीला तिचे नेहमी रक्षण करेल असे वचन दिले.

भगवान श्रीकृष्णांनी देखील दिलेले वचन पाळले. जेव्हा पांडवांनी द्रौपदीला कौरवांकडून जुगारात हरवलं त्यावेळी त्यांनी सगळ्यांसमोर तिचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा द्रौपदीने हात जोडून श्रीकृष्णाचे स्मरण केले.कृष्ण आपल्या बहिणीचे रक्षण करण्यासाठी प्रकट झाले आणि आपले वचन पाळले.

कौरव द्रौपदीची साडी जसजसे ओढत होते तसतसे तिचे शरीर झाकले जात होते.

VIEW ALL

Read Next Story