दुबईमधील बुर्ज खलिफा आपल्या सर्वांनात माहित आहे .ही जगातील सर्वात उंच इमारत आहे ज्याची उंची 820 मीटर उंच आहे.
पण दुबईचा बुर्ज खलिफा अंतराळातून दिसत नाही तर दुबईमधील पाम बेट अंतराळातून दिसतं.
ताडाच्या झाडासारखा आकार असल्यामुळे याला असे नाव मिळाले. आज हे झाज दुबईची ओळख असल्याचे म्हटले जाते.
दुबईचे पाम बेट हा पाम जुमेरा,डेरा व्दीप आणि पाम जेबेल या तीन बेटांच्या समूहापासून बनले आहे.
या बेटाचे बांधकाम 20 वर्षापूर्वी म्हणजेच 2001मध्ये सुरू करण्यात आले होते.6 वर्षानंतर या ठिकाणी इथे लोक राहू लागले.
ताडाच्या झाडासारख्या दिसणाऱ्या या द्विपसमूहात आलिशाम हॉटेल्स, रेस्टॉरंट्स ,आलिशान क्लब आणि अपार्टमेंट देखील आहेत.
या बेटाचा पाया रचण्यासाठी कॉंक्रीट किंवा स्टीलऐवजी वाळू आणि खडकांचा वापर करण्यात आला आहे.