रात्री झोपल्यावर आजूबाजूला कोणीतरी नकारात्मक शक्ती आहे असं वाटतं? 'या' मागे असू शकतात 5 वास्तुदोष

अनेकदा आपण रात्री झोपल्यावर कोणीतरी आपल्याला पाहत आहे अशी भावना निर्माण होत असते.रात्रीच्यावेळी असं वाटणं सामान्य आहे पण तुम्हाला नेहमीच असे वाटत असेल तर तुमच्या घरात वास्तुदोष असू शकतो.अशावेळी वास्तुदोष काढून टाकण्यासाठी या गोष्टी घरातून काढून टाका.

बहुतेकदा घरात एखादे आपले आवडते चित्र किंवा शोपिस तुटलेले असताना देखील जपून ठेवतो.पण तुम्हाला माहित आहे का जर तुम्ही तुटलेल्या वस्तू अशाच घरामध्ये ठेवल्या तर घरात नकारात्मक ऊर्जा राहते. त्यामुळे अशा गोष्टी काढून टाकणं गरजेचे आहे.

तुम्ही ज्या ठिकाणी झोपता त्या ठिकाणी मृत व्यक्तींची छायाचित्रे ठेवू नयेत. मृत व्यक्तींचे छायाचित्र घरात लावल्याने वास्तुदोष निर्माण होऊ शकतो.

जर तुम्ही तुमच्या घरातील निरुपयोगी वस्तु एका बॉक्समध्ये किंवा रद्दी विक्रेताल्या द्यायच्या विचारात असाल तर तो बॉक्स घराबाहेर ठेवणे चांगले राहील.यामुळे देखील घरात वास्तुदोषाची समस्या उद्भवते.

वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशेचे महत्व आहे.शुभ कार्यसाठी पूर्व आणि उत्तर दिशा सर्वोत्तम मानली जाते.तर दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते. झोपताना कधीच दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये . हे देखील वास्तुदोषाचे कारण आहे.

जर तुमच्या घरातसुद्धा एखादं बंद पडलेलं घड्याळ आहे तर आत्ताच ते काढून ठेवा किंवा दुरूस्ती करून घ्या यामुळे वास्तुदोष दूर होतील.विशेषत: तुमच्या घरातील भिंतीवर बंद पडलेलं घड्याळ असेल तर ताबडतोब काढून टाका.

VIEW ALL

Read Next Story