हे गुण जुळावेत यामागे वैवाहिक जीवन सुखात जावे म्हणून पाहिले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार, नाडीचे 8 गुण, गण मैत्रीचे 6 गुण, ग्रह मैत्रीचे 5 गुण, योनी मैत्रीचे 4 गुण, भकूटचे 7 गुण, नक्षत्राचे 3 गुण, वास्यचे 2 गुण आणि वर्णाचा 1 असे 36 गुण असतात.
ज्योतिष्यशास्त्राच्या मते, 18 गुणांपेक्षा कमी गुण जुळत असतील तर लग्नाचा विचार करू नये.
36 गुण जुळणे हे फारच दुर्मिळ असते.
लग्नासाठी किमान 18 गुण जुळणे आवश्यक असते. त्यासाठी जर त्याचे 21 पर्यंत गुण जुळले तर गुणमेलन केले जाते आणि जर का त्याहून जास्त झाले तर विवाह मिलन केले जाते.
लग्नानंतर नववधूचं आणि नवरदेवाचे वैवाहिक आयुष्य हे सुखाचे आणि समृद्धीचे जावो यासाठी त्याचे गुण जुळणंही आवश्यक असते.