वास्तूनुसार घरात चप्पल ठेवण्याची 'ही' आहे योग्य दिशा

घरात कधीच तुळशीच्या झाडाशेजारी चप्पल व बुटं ठेवू नका. यामुळं व्यक्ती कंगाल होऊ शकतो. तसंच, घरात निगेटिव्ह एनर्जी येऊ शकते.

घरातील बेडरुममध्ये कधीच चप्पल व बुटं ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार असं करणं अशुभ मानले जाते. बेडरुममध्ये चप्पल ठेवल्यास वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होतात.

वास्तुशास्त्रानुसार, घरातील मुख्य दरवाजाजवळ चप्पलं ठेवल्यास देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.

अनेक जण स्वयंपाकघरात चप्पल घालून काम करतात वास्तु शास्त्रानुसार, अन्न व अग्नी दोन्ही पुजनीय आहेत.

त्यामुळं त्या परिसरात चप्पल व बुटं घालून फिरणं अशुभ मानले जाते

कधी कधी लोकं घरातील तिजोरी जवळही चप्पल ठेवतात. मात्र जिथे संपत्ती व पैसे ठेवले जातात तिथे चप्पल घेऊन गेल्यास देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते.

वास्तु शास्त्रानुसार घरात चप्पल व बुटं ठेवण्यासाठी दक्षिण किंवा पश्चिम दिशा योग्य आहे. या दिशेला चप्पल ठेवल्यास आर्थिक संकंट दूर होतात.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story