धारणा

जाणून आश्चर्य वाटेल पण अशी धारणा आहे की, कारमध्ये काही वस्तू ठेवल्यामुळं अपघात टळतात आणि संकटाच्या वेळीसुद्धा बळ मिळतं.

गणपतीची मूर्ती

वास्तुशास्त्र नियमांनुसार कारमध्ये गणपतीची मूर्ती ठेवावी. हे अतिशय शुभ असतं. गणपतीला विघ्नहर्ता असंही म्हणतात. परिणामी तुमच्यावर आलेलं संकट हा बाप्पा रोखून धरतो अशी धारणा आहे.

स्फटिक किंवा नैसर्गिक दगड

एखादा स्फटिक किंवा नैसर्गिक दगड कारमध्ये ठेवणंही फायद्याचं असतं. त्यामुळं कारच्या डॅशबोर्डवर दगड किंवा स्फटिक ठेवू शकता. यामुळं धरणी आणि कारमध्ये संतुलन राहतं आणि संकटांपासून तुम्ही दूर राहता.

चिनी भाषेतील नाणी

कारमध्ये चिनी भाषेत लिहिलेली नाणी लटकवणंही अतिशय शुभ मानलं दातं. असं म्हणतात की कारमध्ये ही नाणी असल्यास नकारात्मक शक्ति तिथं फार काळ टीकत नाहीत.

सुगंधित तेल/ द्रव्य

कारमध्ये एक विचित्र वास कायमच येतो. अनेकांना या वासानंही त्रास होतो. अशा वेळी कारमध्ये सुगंधी तैल द्रव्य ठेवणं फायद्याचं ठरतं. ज्यामुळं नकारात्मक विचारांपासून तुमचं लक्ष विचलित होतं.

मीठ

सकारात्मकतेसाठी कारमध्ये मीठ ठेवणंही प्रचंड फायद्याचं. कारच्या आसनाखाली सैंधव मीठ ठेवल्यामुळं तिथं सतत सकारात्मकता जाणवते. हो, पण हे मीठ बदलत राहणंही तितकंच महत्त्वाचं.

सकारात्मक दृष्टीकोन...

थोडक्यात काय, तर कारमध्ये या साऱ्यापैकी एखादी गोष्ट ठेवा. सोबतच तुमचा दृष्टीकोनही सकारात्मक ठेवा. कार चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा आणि अर्थातच वाहतुकीचे नियम पाळा. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story