हिंदू धर्मात तुळशीचे रोप हे सुख-समृद्धीचे प्रतीक मानले जाते. तुळशीची नियमित पूजा केल्यास घरात सुख-शांती नांदते.
ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे कधीच संपत्तीची कमी भासत नाही. घरात सकारात्मकता राहते.
घरातील तुळशीचे रोप वेळोवेळी महत्त्वपूर्ण संकेतही देत असते. चांगल्या व वाईट गोष्टींचे संकेत देत असते.
घरातील तुळशीच्या रोपाला रोज पाणी घालत असतानाही ती अचानक सुकत असेल तर हे अशुभ लक्षण मानले जाते. तुळस सुकणे हे आर्थिक फटका किंवा एखादे संकट येण्याचा इशारा असतो.
तसंच, तुळशीचे रोप आपोआप उगवले असेल किंवा सुकलेली तुळस पुन्हा बहरली तर हे शुभ लक्षण मानले जाते.
अशाप्रकारे तुळशीचे रोप बहरणे हे लवकरत धनलाभ होण्याचे किंवा आनंदाची बातमी मिळण्याचे संकेत असतात.
तुळशीच्या जवळ चिमणी किंवा कोकिळा बसलेली असेल तर तोदेखील चांगला संकेत मानला जातो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)