फक्त 10 रुपयांचे पार्ले-जी बिस्किट वापरुन बनवा अफलातून मिठाई

लहान मुलांसह मोठ्यांनाही आवडणारे पार्ले-जी बिस्किटाच्या मदतीने तुम्ही छान चविष्ट मिठाई बनवू शकणार आहात.

मावा , खरवसचा वापर न करता ही तुम्ही बाजारातील विकतसारखी मिठाई बनवू शकणार आहात.

साहित्य

मोठे चमचे साखर, आर्धा कप उकळलेले दूध, दोन मोठे चमचे तूप, ड्रायफ्रुट्स, पार्लेजी बिस्किट

कृती

सर्वप्रथम एका कढाईत तूप गरम करुन घ्या. त्यानंतर त्यात पार्लेजीची तीन ते चार बिस्किटांचे तुकडे करुन छान भाजून घ्या.

बिस्किट भाजून घेतल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवून द्या. त्यानंतर मिस्करमध्ये वाटून त्याची पावडर बनवून घ्या.

त्यानंतर कढाईत साखर, पाणी आणि थोडी वेलची टाकून साखरेचा पाक करुन घ्या. त्यानंतर या साखरेच्या पाकात बिस्किटांची पावडर टाकून मिश्रण एकजीव करुन घ्या.

मिश्रण एकजीव करुन घेतल्यानंतर त्यात उकळलेले दूध टाकून पुन्हा ढवळून घ्या. 5 ते 10 मिनिटे हे मिश्रण मंद आचेवर ठेवून ढवळून घ्या.

नंतर हे मिश्रण एका थाळ्यात पसरवून घ्या व थोडे थंड झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवा. 3-4 तासांनंतर मिठाईवर ड्रायफ्रुड्स टाकून काप पाडून घ्या.

VIEW ALL

Read Next Story