स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात काही गोष्टी दिसणं शुभ असतं. असे स्वप्न माणसाला त्याची चांगली वेळ येणार आहे याची चाहूल देत असतात.
स्वप्नशास्त्रानुसार, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या स्वप्नात पाहणं शुभ मानण्यात आलं आहे याबद्दल जाणून घेऊयात
स्वप्नात स्वत:ला घोड्यावर बसताना पाहणं शुभ संकेत असतात. याचा अर्थ नोकरी आणि व्यवसायात प्रगती होणार आहे.
जर तुम्हाला स्वप्नात स्वत:ला आरशात निरखून पाहताना दिसलं, तर याचा अर्थ तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद येणार आहे.
स्वप्नात केस कापताना दिसणं तुमच्या योजना पूर्ण होण्याचा संकेत आहे. तर नखं कापताना दिसणं तुम्हाला कर्जातून दिलासा मिळण्याचे संकेत आहेत.
स्वप्नात पाऊस दिसल्यास तुम्हाला एखाद्या जुन्या गुंतवणुकीवर फायदा होऊ शकतो. हा फायदा रुपये किंवा संपत्तीच्या स्वरुपात कसाही असू शकतो.
स्वप्नात स्वत:ला हत्तीची स्वारी करताना पाहणंही चांगले संकेत आहेत. जर तुम्ही सफेद हत्ती पाहिला असेल तर हे एखाद्या मोठ्या यशाचे संकेत आहेत.
स्वप्नात शीतलता आणि शांततेचं प्रतीक चंद्र पाहणंही शुभ आहे. याचा अर्थ लवकरच तुमचा सन्मान वाढणार आहे.