धोनीने दिला 'तो' गुरूमंत्र

अन् रिंकूचं झालं टीम इंडियामध्ये सिलेक्शन!

टीम इंडियामध्ये निवड

कोलकाता नाईट रायडर्ससाठी अफलातून कामगिरी करणाऱ्या रिंकू सिंह याची अखेर टीम इंडियामध्ये निवड झाली आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धा

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात रिंकू सिंहचा समावेश करण्यात आला आहे.

धोनीचा सल्ला

आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर रिंकू सिंहने धोनीचा सल्ला घेतला होता.

माही भाई

माही भाई सोबत झालेला संवाद छान होता, असं रिंकू सिंह सांगतो. त्यावेळी नेमकं काय बोलणं झालं ते देखील सांगितलं.

माही भाईला प्रश्न

धोनी देखील मी ज्या स्थितीत फलंदाजी करतो त्याच स्थितीत फलंदाजी करतो. मी माही भाईला एक प्रश्न विचारला होता, असं रिंकू सांगितलं.

माझा खेळ सुधारायचाय

मी त्याला विचारलं की, माझा खेळ सुधारायचाय, काय करू? त्याचं अगदी सोपं उत्तर धोनीने दिलं.

तू चांगली फलंदाजी करतोय..

तू खूप चांगली फलंदाजी करत आहेस आणि तू जे करत आहेस ते करत रहा, असं धोनी म्हणाला होता.

गुरूमंत्र

दरम्यान, धोनीने दिलेली गुरूमंत्र रिंकूसाठी मोलाचा ठरला आणि अखेर त्याने यशाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं आहे.

VIEW ALL

Read Next Story