पावसाळ्यात Electric गाड्यांची काळजी कशी घ्यायची?

पावसाळा सुरु झाला असून इलेक्ट्रिक वाहन चालकांना आपली वाहनं सुरक्षित ठेवण्यासंबंधी चिंता सतावत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची काळजी कशी घ्यायची हे समजून घ्या.

चार्जिंग डिव्हाइस सुरक्षित ठेवा

पावसाळ्यात इलेक्ट्रिक वाहन सुरक्षित ठेवण्यासाठी चार्जिंग उपकरणं सुरक्षित राहतील याची काळजी घ्या.

शॉर्ट सर्किट होण्याची भीती

जर तुम्ही घराबाहेर चार्जिंग करत असाल किंवा पोर्टेबल चार्जर वापरत असाल तर काळजी घ्या. पाणी गेल्यास शॉर्ट सर्किट होऊन उपकरणं खराब होऊ शकतात.

वाहन कोरड्या भागात उभे करा

इलेक्ट्रिक गाड्या चार्ज करताना त्या शेडमध्ये किंवा कोरड्या भागात पार्क करा. चार्जिंग करण्यापूर्वी शॉर्ट सर्किट होईल अशी काही स्थिती नाही ना याची काळजी घ्या.

बॅटरी व्यवस्थित तपासा

बॅटरी वेळोवळी तपासा. इन्सुलेशन किंवा कनेक्टर ठीक आहेत याची काळजी घ्या. वाहनाच्या विद्युत भागांमध्ये पाणी गेल्यास नुकसान होऊ शकते.

पाणी भरलेले रस्ते टाळा

पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचतं. अशावेळी पाणी भरलेले रस्ते टाळा. ईव्हीमध्ये संवेदनशील इलेक्ट्रॉनिक्स आणि सेन्सर असल्यामुळे ते पाण्यामुळे खराब होऊ शकतात.

बॅटरी पॅकचे आयपी रेटिंग

वाहनाच्या बॅटरी पॅकचे आयपी रेटिंग तपासा. जर बॅटरीत काही त्रुटी जाणवत असेल तर तात्काळ जवळच्या सेंटरमध्ये जाऊन दाखवा.

VIEW ALL

Read Next Story