2023 या वर्षातील शेवटचं गुरु पुष्य नक्षत्र योग! 2024 'या' राशींसाठी लकी

गुरु पुष्य नक्षत्र 29 डिसेंबर 2023 ला सकाळी 01:05 वाजेपासून 30 डिसेंबर 2023 ला पहाटे 03:10 वाजेपर्यंत असणार आहे. गुरु पुष्य नक्षत्रासह अमृत सिद्धी योग आणि त्रिपुष्कर योग जुळून आला आहे.

गुरु पुष्य नक्षत्रामुळे 29 डिसेंबरचा गुरुवारी संपूर्ण दिवस खरेदीसाठी उत्तम आहे. या दिवशी तुम्ही शुभ कार्यदेखील करु शकता.

वृषभ (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरु पुष्य नक्षत्रापासून शुभ असणार आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होणार आहे. गुंतवणुकीसाठी हा सर्वोत्तम काळ असणार आहे.

मिथुन (Gemini)

गुरु पुष्य नक्षत्र मिथुन राशीच्या लोकांवर नशिब पालटणारा ठरणार आहे. यामुळे तुमचा मान-सन्मान वाढणार आहे. नोकरीत पदोन्नती मिळणार आहे.

सिंह (Leo Zodiac)

सिंह राशीच्या लोकांसाठी गुरु पुष्य नक्षत्र खूप शुभ असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. व्यापारी वर्गासाठीही हा काळ शुभ असणार आहे.

कन्या (Virgo Zodiac)

कन्या राशीच्या लोकांसाठी गुरु पुष्य नक्षत्र खूप भाग्यशाली असणार आहे. तुम्हाला काही नवीन जबाबदारी मिळणार आहे. यश आणि प्रगती होणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story