सांध्यांमध्ये साचलेलं प्युरिन बाहेर काढेल 'हे' एक फळ; कायमची नाहीशी होईल सांधेदुखी

युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यामुळे शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं.

सांधेदुखी, स्नायूंमध्ये सूज येणे, जळजळ होणे इत्यादी अनेक समस्या सुरू होतात. त्यामुळे यावर वेळीच नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचं आहे.

त्यामुळे जर तुम्हाला युरिक अ‍ॅसिड कमी करायचं असेल तर केळी मदतशीर ठरु शकतात.

केळ फक्त चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते.

केळीमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते जे शरीरातील यूरिक ऍसिड मूत्राद्वारे काढून टाकण्यास मदत करते.

याशिवाय यामध्ये प्रोटीनचे प्रमाण कमी असल्यामुळे ते युरिक अॅसिडच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.

युरिक अ‍ॅसिडच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात केळीचा समावेश करणे आवश्यक आहे कारण ते आपल्या यूरिक ऍसिडची पातळी सामान्य ठेवते.

सेवन कसं करायचं?

युरिक अ‍ॅसिडच्या रुग्णांनी रोज किमान 3 ते 4 केळांचं सेवन करावं. तुम्ही दुधात मिसळूनही केळी खाऊ शकता. पण सकाळी रिकाम्या पोटी सेवन करायचं नाही याची काळजी घ्या.

नियमितपणे केळी खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते. तसंच पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतील.

VIEW ALL

Read Next Story