'सॅम बहादूर' लवकरच येतोय त्याआधी OTT वर पाहून घ्या हे 6 Biopics

'सॅम बहादूर' लवकरच होणार प्रदर्शित

लवकरच 'सॅम बहादूर' हा विकी कौशलच्या अभिनयाने नटलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

बायोपिक घोषणेपासूनच चर्चेत

भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या आयुष्यावर आधारित हा बायोपिक घोषणेपासूनच चर्चेत आहे.

उत्तम स्टोरी आवडत असतील तर...

1 डिसेंबरला मेघना गुलझार दिग्दर्शित 'सॅम बहादूर' प्रदर्शित होत आहे. मात्र तुम्हाला उत्तम स्टोरी आवडत असतील तर त्यापूर्वी तुम्ही पुढील 6 बायोपीक ओटीटीवर पाहू शकता...

भाग मिल्खा भाग

फ्लाईंग सिख अशी ओळख असलेल्या मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर आधारित 'भाग मिल्खा भाग' हा चित्रपट डिस्ने+ हॉटस्टारवर पाहता येईल.

शेरशाहा

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली असून हा चित्रपट चांगलाच गाजला. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.

संजू

अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित संजू हा चित्रपट रणबीर कपूरच्या अभिनयासाठी ओळखला जातो. हा चित्रपट डिस्ने+ हॉटस्टारवर पाहता येईल.

एम. एस. धोनी. - द अनटोल्ड स्टोरी

महेंद्र सिंग धोनीच्या आयुष्यावरील हा चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अभिनयासाठी ओळखला जातो. हा चित्रपट डिस्ने+ हॉटस्टारवर पाहता येईल.

निरजा

एअर होस्टेस निरजा भानोतच्या शौर्यावर आधारित या चित्रपटातील प्रमुख भूमिका सोनम कपूरने साकारली आहे. हा चित्रपट डिस्ने+ हॉटस्टारवर पाहता येईल.

मेरी कोम

बॉक्सर मेरी कोमची भूमिका अभिनेत्री प्रियंका चोप्राने साकारली असून हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

VIEW ALL

Read Next Story