श्रीगणेशाची जन्मकथा सर्वांनाच माहिती आहे. माता पार्वतीने त्याची निर्मिती केली होती. क्रोधात आलेल्या भगवान शंकर यांनी गणेशाचे शीर धडावेगळे केले होते.
यानंतर श्रीगणेशाला हत्तीचे शिर लावले गेले. पण विघ्नहर्त्याच्या पहिल्या मस्तकाचे काय झाले? तुम्हाला माहिती आहे का?
नसेल माहिती तर जाणून घेऊया. त्यांच्या आधीच्या शीराचे काय झाले? आणि ते सध्या कुठे आहे?
गणेश मंदिरांमध्ये एक मंदिर असेदेखील आहे जिथे त्याचे पहिले मस्तक स्थापित केले आहे. हे मंदिर पाताळाच्या आत आहे. तिथे जाणे खूपच कठीण आहे.
पौराणिक कथेनुसार, भगवान शंकराने आपल्या त्रिशुळाने गणपतीचे मस्तक वेगळे केले होते.
ते मस्तक पृथ्वीच्या खाली पाताळातील एका गुहेमध्ये गेले. त्यानंतर आदिशंकराचार्यांनी या गुहेचा शोध घेतला होता.
या गुहेत स्थापित गणेशाच्या शिराला आदि गणेश असे म्हटले जाते.
पाताळ भुवनेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेले हे स्थान उत्तराखंडयेथील पित्तोरगडच्या गंगोलीहाटहून 14 किमी दूर आहे.
भगवान शंकर स्वत: येथे मस्तकाची सुरक्षा करतात आणि काळजी घेतात, असे सांगितले जाते.