दिवाळी हा आनंदाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा सण आहे. दिवाळी आपल्या प्रियजनांना, मित्रपरिवाना गिफ्ट देऊन शुभेच्छा दिल्या जातात.
अशावेळी दिवाळीच्या दिवशी चुकूनही या 4 गोष्टी कोणालाही देऊ नयेत.
नटराजाची मूर्ती आपल्या नातेवाईकांना आणि प्रियजनांना भेट देऊ नये. कारण नटराजाच्या रूपात शिव एका राक्षसाचा वध करताना दिसत आहे. त्यामुळे नटराजाची मूर्ती गिफ्ट देणे अशुभ मानलं जातं.
दिवाळीला तुम्ही कोणाला भेटवस्तू देणार असाल तर चाकू, कात्री सारख्या धारदार वस्तू देऊ नका. या वस्तू भेट म्हणून दिल्यास नाते खराब होतात.
कोणालाही ताजमहालचे चित्र किंवा मूर्ती किंवा बुडणारी बोट गिफ्ट देणं अशुभ मानलं जातं.
अॅल्युमिनियमच्या वस्तू राहुशी संबंधित असल्यामुळे दिवाळीत अॅल्युमिनियमच्या वस्तू भेट देऊ नये. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)