दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे. नारळाचे दूध, उटणं लावून अभ्यंगस्नान केले जाते
हल्ली बाजारात विकत उटणं मिळतात पण औषधी वनस्पती वापरून तुम्ही घरच्या घरीही उटणं बनवू शकता. पाहा कृती
मुलतानी माती, चंदन पावडर, बेसन, मसूर डाळीचे पीठ, कचोरा पावडर, आवळा पावडर, वाळा पावडर, अनंतमूळ पावडर, गुलाब पावडर, आंबेहळद, नागरमोथा पावडर, कडुलिंबाची पावडर
उटणं बनवण्यासाठी बेसन, मसूर डाळ पीठ आणि कडुलिंबाची पावडर सोडून सर्व साहित्य मिक्स करा
सर्व साहित्य मिक्स करुन चाळणीतून चाळून घ्या.
आता चाळून घेतलेल्या मिश्रणात बेसन, मसूर डाळ, कडुलिंब पावडर घालून सर्व एकजीव करुन घ्या
ज्या दिवशी तुम्ही हे उटणं वापरणार असाल त्यात दूध, गुलाबपाणी आणि थोडं पाणी घालून त्याची जाडसर पेस्ट करावी
(हे सर्व साहित्य वापरताना यातील कोणत्याही गोष्टीची तुमच्या त्वचेला अलर्जी नाही याची पहिले काळजी घेऊन पॅच टेस्ट करा आणि मगच वापरा)