शास्त्रामध्ये ब्रह्म मुहूर्त हा दिवसातील सर्वोत्तम आणि शुभ मुहूर्त मानला गेला आहे.
ज्योतिषांच्या मते, सोमवती अमावस्येला सकाळी ब्रह्म मुहूर्तामध्ये दोन विशेष कार्य केल्यास घराच्या दारापासून दारिद्र्य दूर राहते.
सोमवती अमावस्येच्या दिवशी ब्रह्म मुहूर्ताची वेळ पहाटे 4.38 ते 5.24 पर्यंत असेल.
या ब्रह्म मुहूर्तावर सकाळी झोपेतून उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्या तळहातांकडे पाहून 'ॐ कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती करमूलेः तू गोविन्द, प्रभाते करदर्शनम्' या मंत्राचा जप करावा.
सोमवती अमावस्येला ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून सुख आसनात बसावे. त्यानंतर आपले दोन्ही डोळे बंद करून 'ऊँ ब्रह्म मुरारी पुरान्तकारी भानु शशि भूमिस्तुतों बुधश्च गुरुश्च, शुक्र, शनिए, राहु, केतवा कुरुवंतु सर्वे मर्मे सुप्रभातम ऊँ' या मंत्राचा जप करावा.
ब्रह्म मुहूर्तामध्ये या मंत्राचा जप केल्याने देवी-देवता प्रसन्न होतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी असे मंत्र जपल्याने घरात कधीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही.