विराट कोहली एक उत्तम खवैय्या असून, चमचमीत पदार्थ आपण चवीनं खातो असं त्यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं.
गुलाबजाम हा विराटच्या आवडीचा एक पदार्थ. डाएटवर नसताना विराट आवडीनं खातो तो आणखी एक पदार्थ म्हणजे छोले भटूरे.
काळी डाळ आणि राजमा एकत्र करून तयार केल्या जाणाऱ्या दाल मखनीलाही विराटची विशेष पसंती असते.
गार्लिक नान हा उत्तर भारतात प्रसिद्ध असणारा असाच एक कमाल पदार्थ. यामध्ये तंदूर रोटीवर लसूण आणि तुपाची चव असते.
पनीर खुरचन हा एक पदार्थ विराट आवडीनं खातो. या भाजीमध्ये पनीर विविध भाज्यांसह मसाले मिसळून शिजवला जातो.
राजमा चावल आणि लस्सी हे पदार्थसुद्धा विराटच्या आवडीचे.