भारतात समोसा हा प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ आहे.
लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो समोसा. प्रत्येकाच्या फेव्हरेट फूडपैकी एक पदार्थ.
जर घरी कुणी पाहुणे आले तर समोसा हा आवडीने मागवला जातो. याच पदार्थाने स्वागत केलं जातं.
अशावेळी प्रश्न मनात पडतो की, लग्नात हा पदार्थ का नसतो. मेन्यूमधून समोसा का झाला गायब.
यामागचं कारण अतिशय इंटरेस्टिंग आहे. जाणून घ्या.
भारतात लग्न हे अनेकदा रात्रीचे होतात. त्यामुळे समोसा डिनरच्या मेन्यूमध्ये ठेवला जात नाही. कारण तो त्यामध्ये फिट बसत नाही.
यासोबतच समोसा हा अतिशय कॉमन वाटणारा असा पदार्थ. प्रत्येक गल्लीबोळ्यात हा मिळतो.
यासोबतच समोसा हा पदार्थ पचनासाठी अतिशय जड असतो. त्यामुळे अनेक लोकं हा पदार्थ खाणं टाळतात.
लग्नात इतर पदार्थ खाण्याचा आनंद लुटायचा असतो.