काळा धागा बांधल्याने आर्थिक चणचण कमी होते?
तंत्र विद्यानुसार काळा धागा वाईट शक्तींपासून संरक्षण करण्याचं काम करतो. हे धारण केल्याने नकारात्मक शक्ती वरचढ होत नाहीत. त्याचबरोबर नशीबही बळकट होतं.
वारंवार वाईट नजर लागल्यामुळे तुम्ही आजारी पडत असाल तर आज हनुमान मंदिरातील बजरंगबलीच्या चरणी काळ्या धाग्याला स्पर्श करा. या धाग्याला सिंदूर लावून गळ्यात घाला. यामुळे वाईट नजर दूर होईल.
व्यवसायात आर्थिक नुकसान होत असेल तर शनिवारी हनुमानजीच्या मंदिरात काळा धागा घेऊन जा. या धाग्यात नऊ लहान गाठी बांधा आणि हनुमानजींच्या पायाचं सिंदूर लावा. आता हा धागा दुकानात ठेवलेल्या तिजोरीत बांधा. त्यामुळे प्रगती होईल.
काळा रंग उष्णता शोषक असल्याने वाईट नजर आणि वाईट आत्म्यांपासून देखील आपलं संरक्षण करतं. ज्योतिषशास्त्रानुसार काळा धागा शरीरासाठी संरक्षणात्मक कवच म्हणून काम करतो.
शनिदोष असल्यांनी काळा धागा धारण केल्याने लाभ होतो. यामुळे शनिदेवाचा प्रकोप कमी होतो.
शूत्रपासून बचाव करण्यासाठी मंगळवारी किंवा शनिवारी तुमच्या उजव्या हातावर काळा धागा बांधा. तसंच त्यात शनीचं लॉकेट ठेवा.
अनेक वेळा नजर लागल्यामुळे पाय दुखतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी शनिवारी डाव्या पायावर काळा धागा बांधा.
अनेकांना रात्री नीट झोप येत नाही, त्यांना वाईट स्वप्नं पडतात. या सर्वांपासून दूर राहण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली काळा धागा आणि हनुमान कवच ठेवा.
रविवारी हनुमान मंदिरातून काळा धागा आणून थेट मनगटावर बांधल्याने रखडलेली कामं मार्गी लागतात.
आर्थिक चणचण असेल तर शनिवारी भैरव मंदिरातून काळा धागा आणा. या काळ्या धाग्यावर मोहरीचं तेल लावून उजव्या हाताच्या मनगटावर बांधा. यामुळे पैशाची समस्या दूर होईल. ( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)