मिठाई खाऊनही पंकज त्रिपाठी Fit And Fine कसे? असं Maintain ठेवतात वजन

पंकज त्रिपाठींनीच एका मुलाखतीत केला होता गोड खाद्यपदार्थांच्या आवडीबद्दलचा खुलासा

उत्तम अभिनेता आणि साधं रहाणीमान

अभिनेते पंकज त्रिपाठी हे त्यांच्या उत्तम अभिनयाबरोबरच आपल्या साधेपणासाठीही प्रसिद्ध आहेत.

साधं रहाणीमान

पंकज त्रिपाठी यांच्या स्वभावाप्रमाणेच त्यांचं राहणीमानही अगदी साधं आहे.

मिठाई फार आवडते

पंकज त्रिपाठी यांनी अनेकदा आपल्या मुलाखतींमध्ये खाण्यापिण्याच्या आवडीबद्दल बोलताना मिठाई फार आवडते असं सांगितलं होतं.

आवडते गोड पदार्थ कोणते?

हलवा आणि रसमलाई या दोन गोष्टी आपल्याला प्रचंड आवडतात असं पंकज त्रिपाठींनीच एका मुलाखतीत म्हटलं होतं.

गोड खातात पण मर्यादित

आपण आपल्या आवडीच्या या गोड गोष्टी खातो मात्र फार कमी प्रमाणात असंही पंकज यांनी सांगितलं होतं.

...म्हणून मर्यादित

आपल्या फिटनेसवर परिणाम होऊ नये म्हणून आपण या आवडीच्या गोष्टी फार मर्यादित प्रमाणात खातो असं कारण त्यांनी दिलं होतं.

रोज कोमट पाणी आणि आठवड्यातून एकदा

पंकज त्रिपाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी पितात. आठवड्यातून एकदा ते या कोमट पाण्यामध्ये मध आणि लिंबू मिसळून पितात.

नाश्त्याला काय खातात

सकाळच्या नाश्त्याला पंकज त्रिपाठी मोड आलेली कडधान्यं आणि फळं खातात. ते रोज सकाळी नारळपाणीही पितात.

दुपारचं जेवण

दुपारच्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन आणि व्हिटॅमिनचा मुबलक पुरवठा शरीराला होईल असं खाणं पंकज खातात.

कमी तेल आणि कमी मसाले

पंकज यांच्या जेवणामध्ये सॅलडचा समावेश आवश्यक असतो. ते कमी तेल आणि कमी मसाले असलेलं जेवण घेतात.

चणे आणि बदाम खातात

संध्याकाळी जेव्हा भूक लागते तेव्हा पंकज त्रिपाठी चणे आणि बदाम खातात.

रात्रीच्या जेवणात काय?

रात्रीच्या जेवणात पंकज त्रिपाठी अगदी हलका आहार घेतात. यामध्ये प्रामुख्याने सूप आणि सॅलडचा समावेश असतो.

VIEW ALL

Read Next Story