...अन् मुंबईच्या पावसात बेभान होऊन नाचले Zomato चे Delivery Agents

या फोटोंच्या माध्यमातून देण्यात आलेला संदेश पाहून डोळे पाणावतील अन् उघडतीलही

पावसाळा अन् डिलेव्हरी एजंट्स

दरवर्षी पावसाळ्यामध्ये आवर्जून चर्चेत असणारा विषय म्हणजे ऑनलाइन फूड डिलेव्हरी कंपन्यांसाठी कामं करणारे डिलेव्हरी एजंट्स.

डिलेव्हरी एजंट्स खरोखरच कौतुकास पात्र

भर पवासामध्ये अगदी गुडघाभर पाणी असेल तर ऑर्डर केलेले पदार्थ वेळेत ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी कष्ट करणारे हे डिलेव्हरी एजंट्स खरोखरच कौतुकास पात्र असतात यात शंका नाही.

नाचणारे डिलेव्हरी एजंट्स

पण सध्या सोशल मीडियावर याच डिलेव्हरी बॉइजचे काही अनोखे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये हे डिलेव्हरी एजंट्स नाचताना दिसत आहेत.

मुंबईच्या पावसाचा आनंद

चार वेगवेगळे डिलेव्हरी एजंट्स मुंबईच्या पावसाचा आनंद घेत असल्याचं दिसत आहे.

खास मेसेज देण्याचा प्रयत्न

एका कॉलवर घरपोच ऑर्डर देणारे हे डिलेव्हरी एजंट्सही आपल्यासारखा माणसूच असून त्यांनाही धावपळीच्या आपल्या प्रोफेशनमध्ये क्षणभर पावसाचा आनंद घेण्याचा हक्क आहे, असं या फोटोंच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

थोडं आयुष्य जगू लागलो होतो त्यामुळे...

"सॉरी सर, ऑर्डरला उशीर झाला. थोडं आयुष्य जगू लागलो होतो त्यामुळे उशीर झाला. झोमॅटो असं नोटिफिकेशनही पाठवत जा. मनापासून आनंद होईल याचा," अशा कॅफ्शनसहीत हे नाचणाऱ्या डिलेव्हरी एजंट्सचे फोटो शेअर करण्यात आलेत.

महिलेनेही घेतला पावसाचा आनंद

या फोटोंमध्ये एक महिला डिलेव्हरी एजंटही हात पसरवून मनसोक्तपणे पावसाचा आनंद घेताना दिसत आहे. या फोटोंवरील झोमॅटोचं नोटिफिकेशनही लक्ष वेधून घेणारं आहे.

मात्र हे सर्व एआय फोटो

पण हे खरंच घडलं नसून हे सर्व फोटो एआय म्हणजेच आर्टिफिशिएल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहेत.

कोणी शेअर केलेत हे फोटो?

हे फोटो लिंक्डइनवर सौरभ दहाभाई यांनी शेअर केले असून सध्या हे फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत.

अनेकांनी केलं कौतुक

अनेकांनी कमेंट करुन खरोखरच आपण डिलेव्हरी एजंट्सचाही विचार केला पाहिजे, फार छान विचार फोटोंमधून मांडलाय असं म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story