नाकाच्या डाव्या बाजूलाच नथ का घालावी? फायदे एकदा पाहाच

भारतीय संस्कृतीत मानाचे आणि सौभाग्याचे लक्षण म्हणून नथ ओळखली जाते.

नथीशिवाय महाराष्ट्रीय साज अपूर्ण आहे. सौंदर्यात भर घालणाऱ्या या नथीचे आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत

नथ किंवा छोटी चमकी नाकाच्या डाव्या नासिकेत घातली जाते. डाव्या नाकपुडीवर नथ टोचून घेतल्यास आरोग्यालाही मोठे फायदे मिळतात

स्त्रियांच्या डाव्या नासिकेतून जाणाऱ्या काही रक्तवाहिन्या गर्भाशयाशी जोडलेल्या असतात. त्यामुळं स्त्रियांना प्रसवपीडा कमी होते.

डाव्या नाकपुडीच्या मध्यभागी नाक टोचवून घेतल्यास महिलेला बाळंतपणात फार त्रास सहन करावा लागत नाही.

मासिक पाळीत अतिरिक्त रक्तस्त्राव व पाळीच्या दिवसांत होणारा त्रास कमी होतो, असं म्हटलं जातं.

डाव्या नाकपुडीवर अॅक्युप्रेशर पॉइंट असतो त्यामुळं वाताचे सर्व प्रकार आपल्याला टाळता येतात.

नाक टोचल्यानंतर तिथे चांदीची किंवा सोन्याचा धातू घातल्यास शरिरातील उष्णता कमी होते.

नाक टोचल्याने मायग्रेनचा त्रासही कमी जाणवतो, असं म्हटलं जातं

नाक टोचल्यामुळं मासिक पाळीत व गरोदरपणात होणारे मूड स्विंगज कमी होतात व मनात नकारात्मक विचार येणे थांबतात व मन एकाग्र होते.

VIEW ALL

Read Next Story